BGT 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT 2024-25) चा पाचवा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे.
आता सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशीही फलंदाजीत टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडिया पहिल्या दिवशी 185 रन्सवर ऑलआऊट झाली होती.
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर आहे, तर त्याचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेत बुमराहची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरला आहे.
BGT 2024-25: मध्ये जसप्रीत बुमराह खास विक्रम करण्याच्या जवळ !
जसप्रीत बुमराहने या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. बुमराह हा या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मेलबर्न कसोटीपर्यंत बुमराहने या मालिकेत 30बळी घेतले होते.
BOOM BOOM BUMRAH STRIKES. NEVER MESS WITH BUMRAH 🥵#AUSvIND #AUSvsIND #INDvAUS #INDvsAUS pic.twitter.com/TBUqOGTIK8
— Pro Cricket PK🇵🇰 (@Pro_CricketPK) January 3, 2025
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर बुमराहने एक विकेट आधीच घेतली होती. आता या मालिकेत बुमराहच्या नावावर 31 विकेट्स आहेत. आता बुमराह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्यापासून फक्त 2 विकेट दूर आहे.
BGT मध्ये नंबर वन हरभजन सिंगचे नाव!
या यादीत टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. हरभजनने 2000/01 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 3 सामन्यांमध्ये 178.3 षटकात 545 धावा देऊन 32 बळी घेतले होते. या काळात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 84 धावांत 8 बळी होती.
आता हा विक्रम मोडण्यापासून बुमराह 2 विकेट दूर आहे. आता सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांच्या नजरा बुमराहवर खिळल्या आहेत. तो दुसऱ्या दिवशी 2 विकेट्स घेताचबोर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात सर्वांत जास्त विकेट्स घेणार गोलंदाज बनेल.
याशिवाय माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनचे नाव यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2012/13 मध्ये 4 सामन्यात 29 बळी घेतले होते.
हेही वाचा:
Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?