Big Bash League: ग्लेन मेक्सवेलने घेतला जबरदस्त झेल, आजपर्यंत कोणताही खेळाडू घेऊ शकला नाहीये असा झेल..

Big Bash League  तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत अनेक झेल पाहिले असतील, पण बिग बॅश लीगमध्ये एका सामन्यात ऑस्ट्रोलियाचा अष्टपैलू खेळाडू   ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ने घेतलेला झेल पाहू तुम्ही नक्कीच आच्छर्यचकित व्हाल.. मेक्सवेलने असा झेल घेतला आहे जो, पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसह तिथे उपस्थिती असलेले सर्वच लोक टाळ्या वाजवायला लागले.

Big Bash League: ग्लेन मेक्सवेलने घेतला जबरदस्त झेल, आजपर्यंत कोणताही खेळाडू घेऊ शकला नाहीये असा झेल..

ग्लेन मेक्सवेलने घेतला जबरदस्त झेल

मॅक्सवेलने जवळपास सीमारेषेपर्यंत पोहोचलेल्या चेंडूचे झेलमध्ये रूपांतर केले. झेल घेताना अष्टपैलू खेळाडूचे शरीर संतुलन अप्रतिम होते. सुरवातीला हा झेल तो घेऊ शकणार नाही आणि चेंडू थेट सीमारेषेपार जाईल असेच वाटत असताना त्याने हा झेल टिपून सर्वाचा चकित केले.

मॅक्सवेलकडे पाहता हा झेल अजिबात अवघड आहे असे क्षणभरही वाटले नाही. मॅक्सवेलच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूचा हा झेल पाहून चाहते चकित झाले आहेत.

बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 149 धावा केल्या.

पहा व्हायरल व्हिडीओ:

संघाच्या डावाच्या 17व्या षटकात मॅक्सवेलने सीमारेषेवर असा पराक्रम केला की सगळेच थक्क झाले. बॅट्समन विल प्रेस्टविट्झने डॅन लॉरेन्सच्या हातातून चेंडू जोरात मारला. पहिल्या दृष्टीक्षेपात चेंडू पाहून तो थेट सहा धावांपर्यंत जाईल असे वाटत होते. मात्र मेक्सवेलने त्याचे रुपांतर झेलात करून सर्व चाहत्यांची मने जिंकली.


हेही वाचा:

Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्त

Leave a Comment