Champions Trophy 2025: भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे बूम-बूम बुमराह या स्पर्धेत कामगिरी करताना दिसणार नाही. जस्सीच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजीचा हल्ला थोडा कमकुवत दिसत आहे.
क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बुमराहची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवू शकते. तथापि, बीसीसीआयचे नवे सचिव देवजित सैकिया यांचे मत पूर्णपणे वेगळे आहे. देवजित म्हणतो की बुमराहच्या अनुपस्थितीमुळे संघ संयोजनात फारसा फरक पडणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावण्यात टीम इंडिया यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बूमराह च्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही-देवजित सैकिया
बीसीसीआय सचिवा देवजित सैकियानी Sports Wordz बोलताना सांगितले की,
‘आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वोत्तम संघ निवडला आहे. आणि मला खात्री आहे की, आम्ही ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होऊ. भारतीय संघाकडे प्रचंड बेंच स्ट्रेंथ आहे आणि बुमराहच्या अनुपस्थितीमुळे संघ संयोजनात फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही. संघात सर्वकाही पूर्णपणे सकारात्मक आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली फॉर्ममध्ये परतले आहेत. तुम्ही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेकडे पहा. निकाल तुमच्या समोर आहेत. दुबईतील परिस्थिती जवळजवळ भारतासारखीच असणार आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्यांना इंग्लिश संघाला व्हाईटवॉश करण्यात यश आले. संघाचे मनोबल खूप उंचावले आहे.”
Champions Trophy 2025:शेवटच्या क्षणी जसप्रीत बूमराह बाहेर तर वरुणला मिळाली एन्ट्री
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शेवटच्या क्षणी त्यांच्या संघात बदल केले आहेत. बुमराहला बाहेर केल्यानंतर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, या स्पर्धेसाठी गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. वरुणला संघात प्रवेश मिळाल्यानंतर यशस्वी जयस्वालला मुख्य संघातून वगळण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला अ गटात स्थान देण्यात आले आहे.
टीम इंडिया २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, संघाचा पुढील सामना २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी होईल. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात, रोहितचा संघ २ मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करताना दिसेल. अलिकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा ३-० असा पराभव केला, त्यानंतर संघाचे मनोबल उंचावले आहे.
हेही वाचा: