“आम्ही भारताला जास्त महत्व देत नाही….” Champions Trophy 2025 सुरु होण्याआधी पाकिस्तानच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य

Champions Trophy 2025:  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. हा सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा उपकर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Aaga) याने या सामन्याबाबत मोठे विधान केले आहे. त्याने थेट भारतीय संघाला इशाराच दिला आहे.

Champions Trophy, Jasprit Bumrah Update : जसप्रीत बूमराह दुखापतीमुळे CT मधून बाहेर, या गोलंदाजाला मिळाली संधी..

तो म्हणाला की, त्याच्या संघासाठी, कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध जिंकण्यापेक्षा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, जर त्यांच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नाही तर भारताला हरवण्यात काही अर्थ राहणार नाही.

पीसीबी पॉडकास्टवर बोलताना सलमान म्हणाला की,

भारताकडून हरणे आणि नंतर जेतेपद जिंकणे ही एक मोठी कामगिरी असेल. पाकिस्तान या स्पर्धेचा गतविजेता आहे, त्यांनी शेवटचा ट्रॉफी २०१७ मध्ये जिंकला होता. आगा पुढे म्हणाले, ‘पाकिस्तान-भारत सामना हा सर्वात मोठा आहे, पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे त्याहूनही महत्त्वाचे आहे. जर आपण भारताला हरवले पण स्पर्धा जिंकली नाही, तर त्या विजयाचे काही महत्त्व राहणार नाही. तथापि, जर आपण भारताकडून हरलो पण ट्रॉफी जिंकली तर ती एक मोठी कामगिरी असेल. आमचे लक्ष्य चांगली कामगिरी करणे आणि ही मोठी स्पर्धा जिंकणे आहे. त्यामुळे या सामन्यात आम्ही भारताला खूप जास्त महत्व देत नाही.

 

१९ फेब्रुवारीपासून सुरूहोणार Champions Trophy 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025)  १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये सह-यजमान पाकिस्तान स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना करेल. संपूर्ण स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जात आहे, जिथे भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. कारण भारत या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास तयार नव्हता. भारताने शेवटचा २००८ मध्ये पाकिस्तान देशाचा दौरा केला होता, त्यानंतर राजकीय तणावामुळे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. आघा म्हणाला की, लाहोरमध्ये त्याच्या घरच्या प्रेक्षकांसमोर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे त्याच्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे असेल.

"आम्ही भारताला जास्त महत्व देत नाही...." Champions Trophy 2025 सुरु होण्याआधी पाकिस्तानच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मी उत्साहित आहे – सलमान

सलमान पुढे  म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मी उत्साहित आहे आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करत आहे हे विशेष आहे. लाहोरचा रहिवासी म्हणून, माझ्या गावी ट्रॉफी उचलणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असेल. पाकिस्तान संघात स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे.


हेही वाचा:

IND vs ENG: रोहित शर्मा कडे इतिहास रचण्याची संधी, तिसऱ्या एकदिवशीय सामन्यत करू शकतो अशी ऐतिहासिक कामगिरी..!

IND vs ENG 3rd ODI: तिसऱ्या एकदिवशीय सामन्याआधी जय शहाची मोठी घोषणा, सामन्याच्या ठीक अर्धा तास आधी होणार विशेष प्रोग्राम..!

Leave a Comment