शिखर धवन हुमा कुरेशी रिलेशनशिप: भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवनने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो 2022-2024 पर्यंत आयपीएल संघ पंजाब किंग्जचा कर्णधार होता, परंतु त्याला दुखापतीच्या समस्येचा सामना करावा लागला आणि 2023 च्या विश्वचषकापूर्वी त्याला टीम इंडियाच्या संघातून वगळण्यात आले. शेवटी, त्याने आपल्या कारकिर्दीला निरोप दिला आणि निवृत्तीचा निर्णय घेतला.
शिखरच्या क्रिकेट कारकीर्द वगळता तो वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. 2023 मध्ये धवनला त्याची माजी पत्नी आयशा मुखर्जीने घटस्फोट (Shikhar Dhavan Ayasha Mukharji Divorce) दिला होता आणि 2020 पासून हे जोडपे वेगळे राहत आहेत.
शिखर धवन घटस्फोटानंतर करतोय हुमा कुरेशीला डेट? (Shikhar Dhavan Dating Actress Huma Kureshi?)
धवनच्या विभक्त झाल्यामुळे अनेक डेटिंग अफवा पसरल्या, ज्यात एक माजी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज (Mitali Raj) हिचा समावेश आहे. तो मितालीशी लग्न करण्यास तयार असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, या अफवेचे खंडन खुद्द धवनने एका शोमध्ये केले होते. अलीकडेच पुन्हा एकदा धवन बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला डेट (Shikhar Dhavan and huma qureshi Dating) करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
‘डबल एक्सएल’ चित्रपटात शिखर धवन आणि हुमा कुरेशीने केलय सोबत काम.
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी अभिनीत ‘डबल एक्सएल’ नावाचा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाही होती आणि शिखर धवननेही या चित्रपटात विशेष भूमिका साकारली होती. धवनला अभिनयाची आवड म्हणून ओळखले जाते आणि तो लवकरच व्यावसायिकपणे अभिनय करू शकतो.
दरम्यान आता अफवा उडू लागल्या आहेत की, अभिनयानंतर धवन हुमाला डेट करत आहे आणि दोघांचे एकत्र फोटो काही सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल झाले आहेत. काही दिवसापासून या दोघांच्या लग्नाच्या फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. या वायरल फोटोनुसार शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी चक्क लग्न केले असल्याचे बोलले जात आहे. या दाव्यात किती सत्यता आहे जाणून घेऊया..
शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरोखरच केले आहे लग्न? काय आहे वायरल फोटोचे सत्य..
सोशल मिडीयावर शिखर आणि हुमा कुरेशी यांच्या लग्नाची जी छायाचित्रे वायरल होत आहेत ती खरी आहेत का ? खरच या दोघांनी लग्न केले आहे का? असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडत आहेत.
तुमच्या प्रश्नांवर उत्तर समोर आले आहे. प्रत्यक्षात शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी एकही फोटो एकत्र क्लिक केला नाही आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेली सर्व छायाचित्रे एआयने तयार केली आहेत. ते विवाहित नाहीत आणि डेटिंग करत नाहीत. अलीकडे AI ने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे प्रतिमांचे डॉक्टरिंग करणे खूप सोपे झाले आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेले सर्व फोटो हे AI ने बनवलेले असून शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी लग्न केलेले नाहीये.
याआधी मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्याही लग्नाच्या फोटो झाल्या होत्या वायरल .
शिखर आणि हुमा प्रमाणेच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा (Sania Mirza And Mohmmad Shami affair) यांच्या लग्नाच्या फोटो देखील वायरल झाल्या आहेत. या फोटोमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या दोघांनी लग्न केले आहे.
तर ही सुद्धा खोटी बातमी होती आणि आता तशीच बातमी धवन आणि हुमाबद्दल पसरवली जात आहे. हुमा तिचे ॲक्टिंग कोच रचित सिंगला डेट करत असल्याची माहिती आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात हे जोडपे एकत्र दिसले होते.
या वायरल फोटो वरून हेच सिद्सोध होतंय की,शल मिडीयावर AI चा वाढला वापर नक्कीच चिंतेचा विषय बनत चालला आहे.
हेही वाचा: