ICC Champions Trophy 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ – क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदा एकूण आठ देशांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी टूर फिरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र बीसीसीआयने आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफी २०२५ या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना पाकिस्तानमध्ये पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अशातच आयसीसीने टूरच वेळापत्रक जाहीर केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे या ट्रॉफी टूरला कालपासून म्हणजेच १६ नोव्हेम्बरपासूनच सुरुवात झालेली आहे. आयसीसीने पाकिस्तान समोर हायब्रीड मॉडेलचा विषय मांडला मात्र अद्याप पाकिस्तानकडून त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. १६ ते २५ नोव्हेंबर पर्यंत पाकिस्तानमध्ये ही ट्रॉफी टूर होईल.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश. साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि मग भारत असा हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा असेल. दरम्यान, भारतात हि टूर १६ ते २५ नोव्हेम्बर या काळात भारतात होणार आहे. कोणत्या शहरात किती तारखेला सामने असतील हे अजून जाहीर झाले नसल्याने क्रिकेटप्रेमी वाट बघून आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानसह ८ यजमान देशांमध्ये यंदा खेळण्यात येणार आहे. मागच्या वन डे वर्ल्ड काप स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना पराभूत करत यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं तिकीट मिळवलं आहे.