IND vs AUS 2nd Test: ॲडलेडमध्ये ‘प्रिन्स’ शुभमन गिल खेळणार की नाही ? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितले..

IND vs AUS 2nd Test:  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला, जो टीम इंडियाने 295 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्याला अजून बराच वेळ बाकी आहे.

ॲडलेड कसोटीसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी उपस्थित असणार ,हे नक्की झाल आहे. रोहित ने यासाठी सराव देखील सुरु केला आहे तो 2 दिवसापूर्वीच ऑस्ट्रोलियामध्ये दाखल झाला आहे.

IND vs AUS 2nd Test: ॲडलेडमध्ये प्रिन्स खेळणार की नाही ? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितले..,
Image Courtesy: BCCI
IND vs AUS 2nd Test:   गिल दुसऱ्या सामन्यातून बाहेर!

पर्थ कसोटीपूर्वी सराव सामन्यादरम्यान शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्यातूनही बाहेर राहावे लागले.

यानंतर आता गिल ॲडलेड कसोटीपूर्वीच्या दोन दिवसीय सराव सामन्यात सहभागी होऊ शकणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे ॲडलेड कसोटीतही गिलच्या खेळण्यावर साशंकता आहे. यावर आता स्वतः कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे .

IND vs AUS 2nd Test:  शुभमन गिल बाबत काय म्हणाला रोहित शर्मा?

टीम इंडियाचा फुल टाईम कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रोलियामध्ये आल्यानंतर पत्रकार परिषद घेत दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीचा आढावा सांगितला आहे. त्यात रोहितने शुभमन गिलच्या इंजरी विषयी अपडेट देतांना म्हटले आहे की,

शुभमन सध्या दुखापतीमधून सावरत आहे मात्र तो ॲडलेड कसोटी मध्ये खेळू शकेल का नाही? हे आताच सांगने कठीण आहे.दुसऱ्या कसोटीला आतापासून 8 दिवसाचा वेळ बाकी आहे, त्यामुळे तो या वेळेत सावरूही शकतो.. याबद्दल संघ त्या वेळी निर्णय घेईल आणि सर्वांना कळवण्यात येईल,असे रोहित म्हणाला.

“गिलला दुखापत झाल्यानंतर वैद्यकीय तज्ञांनी 10-14 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. आठवड्याच्या शेवटी तो सराव सामन्यात खेळणार नाही आणि सध्या त्याच्या दुसऱ्या कसोटीतील सहभागावर शंका आहे. त्याची दुखापत किती बरी झाली आहे, त्याचे बोट कसे चालले आहे ते पाहू या. दुखापत बरी झाल्यानंतरही त्याला कसोटी सामना खेळण्यापूर्वी चांगल्या सरावाची गरज आहे.

IND vs AUS 2nd Test: ॲडलेडमध्ये प्रिन्स खेळणार की नाही ? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितले..,IND vs AUS 2nd Test: शुभमन गिल ऐवजी देवदत्त पडीकलला पुन्हा संधी मिळणार?

शुभमन गिल पर्थ कसोटीतून बाहेर पडल्यानंतर देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात आली होती. मात्र, पडिकलने पहिल्या सामन्यात खराब कामगिरी करून चाहत्यांची निराशा केली होती. मात्र, पडिकलने दुसऱ्या डावात काही धावा केल्या. आता गिलच्या अनुपस्थितीत संघ पडिकलला आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे.


हेही वाचा:

ipl 2025 Mega Auction: आयपीएलच्या मागच्या हंगामात विराट कोहलीशी मैदानात भिडणाऱ्या खेळाडूवर कुणीही नाही लावली बोली, बेस प्राईज एवढी असूनही संपले करिअर..

LSG FULL SQUAD for IPL 2025: रिषभ पंत कर्णधार तर ‘हा’ खेळाडू उपकर्णधार..! मेगा लिलावात तब्बल एवढे खेळाडू विकत घेऊन,लखनौने बनवला जबरदस्त संघ पहा खेळाडूंची यादी..

Leave a Comment