IND vs AUS 5th test live: टीम इंडियाला मोठा धक्का, चालू सामन्यातून जसप्रीत बूमराह हॉस्पिटलमध्ये भरती; नक्की काय झाले बूमराहला?

IND vs AUS 5th test live: सध्या सिडनीच्या मैदानावर बोर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. शेवटच्या सिडनी कसोटीत सध्या दोन्ही संघांचा पहिला डाव संपला असून भारतीय संघ 4 धावांनी समोर आहे.

मात्र यादरम्यान भारतीय संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

India vs Australia 5th Test: शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, दोन खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी?, पहा संभावित प्लेईंग 11

IND vs AUS 5th test live: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा धक्का,जसप्रीत बूमराहने सोडले मैदान.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा धक्का बसला असून, संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहला मैदान सोडावे लागले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीच्या (BGT 5th Test) दुसऱ्या दिवशी दुखू लागल्याने बुमराह मैदानाबाहेर गेला. त्याचा एक व्हिडिओ दिसत आहे, ज्यामध्ये तो दोन सपोर्ट स्टाफ सदस्यांसह स्कॅनसाठी स्टेडियमच्या बाहेर जाताना दिसत आहे.

बुमराहने लंचच्या 30 मिनिटे आधी मैदान सोडले, परंतु नंतर तो परतला आहे. उपाहारानंतरच्या सत्रात, बुमराह पुन्हा एक षटक खेळून मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी बदली क्षेत्ररक्षक अभिमन्यू इसवरन मैदानात आला. रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

IND vs AUS 5th test live बुमराहने रचला इतिहास,ठरला एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज!

या सामन्यात बुमराहने आतापर्यंत 10 षटकात दोन विकेट घेतल्या आहेत. एकूण, उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने या मालिकेत 32 बळी घेतले आहेत. या मालिकेतील भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद सिराज आहे ज्याने आतापर्यंत 18 बळी घेतले आहेत.

IND vs AUS 5th test live: टीम इंडियाला मोठा धक्का, चालू सामन्यातून जसप्रीत बूमराह हॉस्पिटलमध्ये भरती; नक्की काय झाले बूमराहला?

या कसोटी आणि मालिकेच्या निकालात बुमराहची दुखापत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तो केवळ भारताचा सर्वोत्तम स्ट्राईक गोलंदाज नाही तर नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या कसोटीसाठी कर्णधारही आहे, ज्याने फलंदाजीच्या खराब फॉर्ममुळे मालिकेतील निर्णायक सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा:

Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्त

Leave a Comment