IND vs AUS 5th Test: भारतीय संघाला मोठा धक्का, पाचव्या कसोटीतून बाहेर पडणार ‘हा’ दिग्गज खेळाडू..

IND vs AUS 5th Test: बोर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाचवा आणि शेवटचा  कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. मेलबर्न कसोटीतील दारुण पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत 1-3ने पिछाडीवर आहे.

 IND vs AUS 5th Test WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

चौथ्या कसोटीतील मानहानीकारक पराभवामुळे आता सिडनी कसोटीबाबत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही (IND vs AUS 5th Test Probable playing 11)  बदल पाहायला मिळू शकतात. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सिडनी कसोटीतून बाहेर पडू शकतो.

IND vs AUS 5th Test पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार?

ऋषभ पंतची या मालिकेत आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झालेली नाही. अनेक प्रसंगी संघाला पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या, त्यामुळे या खेळाडूने खराब शॉटवर विकेट गमावून संघाची आणि चाहत्यांची निराशा केली आहे. पंतने मेलबर्न कसोटीत असेच काही केले आणि त्याची विकेट ट्रॅव्हिस हेडला दिली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही पंतच्या या फटक्याने निराश झाला. पंत बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.

या मालिकेत आतापर्यंत पंतने चार सामन्यांत केवळ 154 धावा केल्या आहेत. या काळात पंतची सरासरी केवळ 22 आहे. आतापर्यंत या मालिकेत पंतच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलेले नाही. अशा स्थितीत या खेळाडूला सिडनी कसोटीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

IND vs AUS 5th Test ध्रुव जुरेलला मिळणार संधी?

यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची देखील बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे, मात्र आतापर्यंत जुरेलला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्युरेल पर्थ कसोटीत खेळताना दिसला, त्याने पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात फक्त 1 धावा काढल्या.

IND vs AUS 5th Test: भारतीय संघाला मोठा धक्का, पाचव्या कसोटीतून बाहेर पडणार 'हा' दिग्गज खेळाडू..

मात्र, त्याआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात झालेल्या सामन्यात त्याची कामगिरी चांगली होती. ज्यामध्ये त्याने 80 आणि 68 धावांची खेळी खेळली. आता पंतला सिडनी कसोटीतून वगळल्यास ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.आता पाचव्या कसोटसाठी भारतीय संघात कसे बदल होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे..


 

हेही वाचा:

Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्त


 

Leave a Comment