IND vs AUS live: चालू सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रोलियन प्रेक्षकांना खिसा रिकामा करून का दाखवला?, नक्की काय प्रकरण…

IND vs AUS live: भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) ने  स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर सँडपेपरच्या वादावर ऑस्ट्रेलियन चाहत्यांना छेडले.नक्की काय आहे हे प्रकरण आणि विराटने अशे का केले जाणून घेऊया सविस्तर..

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा कर्णधार असलेल्या कोहलीने स्मिथ बाद झाल्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून खिसा रिकामा करून दाखवला.

IND vs AUS live: स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने प्रेक्षकांना खिसा रिकामा करून दाखवत स्मिथच्या जखमेवर चोळले मीठ, नक्की काय प्रकरण?

IND vs AUS live: विराटने स्मिथ बाद झाल्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून खिसा रिकामा करून का दाखवला?

विराट कोहलीने ऑस्ट्रोलियाच्या प्रेक्षकांना खिसा रिकामा करून दाखवण्यामागे चेंडूशी छेडछाड करण्यासाठी तो खिशात काहीही ठेवत नसल्याचे दाखवून देने, हे कारण होते. आता पाहूया विराट कोहलीने स्मिथ बाद होताच असे का केले?

कोहलीने हे केले कारण सिडनी कसोटीचा दुसरा दिवस संपल्यानंतर काही लोकांनी भारतीय संघावर चेंडूशी छेडछाड   केल्याचाआरोप केला होता. ही बाब उद्भवली कारण एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये खेळाडूच्या बुटातून कागद किंवा कापडाचा तुकडा बाहेर आला होता. हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

काही चाहत्यांनी असेही म्हटले की, भारतीय खेळाडूने त्याच्या शूजमध्ये सँडपेपर लपवला होता. अशाप्रकारे कोहलीने तिसऱ्या दिवशी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन चाहत्यांची खिल्ली उडवत या आरोपाला उत्तर दिले.

पहा व्हिडीओ

 सँडपेपरगेट घोटाळ्यात स्मिथ होता सामील , म्हणूनच स्मिथ  बाद होताच कोहली ने त्याला डिवचले.

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीदरम्यान कुप्रसिद्ध सँडपेपरगेट घोटाळ्यात स्टीव्ह स्मिथ सुद्धा सहभागी होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर करून त्यांना रिव्हर्स स्विंग करण्यास मदत केली मात्र, त्यांची कृती कॅमेऱ्यात कैद झाली.

ipl 2025 Mega Auction: आयपीएलच्या मागच्या हंगामात विराट कोहलीशी मैदानात भिडणाऱ्या खेळाडूवर कुणीही नाही लावली बोली, बेस प्राईज एवढी असूनही संपले करिअर..

नंतर हे आरोप सिद्ध झाले त्यामुळे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली. त्याच गोष्टीचा पुन्हा उल्लेख करून कोहलीने प्रत्यक्षपणे स्टीव्ह स्मिथच्या जखमेवर मीठ चोळले आहे.


हेही वाचा:

4,4,4,0,4,4:..! युवा यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला धुतले, डावाच्या पहिल्याच षटकात ठोकल्या एवढ्या धावा..

Leave a Comment