IND vs AUS Live: मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आमनेसामने आहेत. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे.
यजमान संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. हे वृत्त्यांत लिहीपर्यंत त्यांची एकूण आघाडी 240 धावांवर पोहोचली आहे. जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohmmd Siraj) या वेगवान गोलंदाजांच्या धक्क्यातून कांगारू कॅम्प आता सावरला आहे.

एकेकाळी 91 धावांवर 6 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करत होता. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला टीम इंडिया स्वस्तात ऑलआऊट करू शकेल, असे वाटत होते. मात्र, यशस्वी जैस्वालच्या एका चुकीमुळे भारतीय संघाच्या आशा-आकांक्षांना तडा गेला आहे. एवढेच नाही तर हा 23 वर्षीय तरुण भारतीय संघाच्या पराभवाचे कारणही बनू शकतो. सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
IND vs AUS Live: यशस्वी जैस्वाल बनणार टीम इंडियाच्या पराभवाचे कारण?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (BGT 2024/25) च्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार खेळी केली. या डावखुऱ्या फलंदाजाने 82 धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या युवा फलंदाजाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होऊ लागले. मात्र, यशस्वी रातोरात नायकाकडून खलनायक बनला आहे.
3rd drop catch for Yashasvi Jaiswal today. One of the best fielder having a poor day. pic.twitter.com/TfUOSQO8CM
— Div🦁 (@div_yumm) December 29, 2024
IND vs AUS Live: यशस्वी जयस्वालने सोडले 3 झेल, ठरू शकते पराभवाचे कारण.
खरे तर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने आतापर्यंत एकूण तीन झेल सोडले आहेत. पहिल्या सत्रात यशस्वीने तिसऱ्या स्लिपमध्ये आकाश दीपच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 8 धावा होती. यानंतर दुसऱ्या सत्रात जैस्वालने आकाश दीपच्या चेंडूवर मार्नस लॅबुशेनला पुन्हा जीवदान दिले.हा झेल खूप सोपा होता. मात्र, त्या संधीचे सोने करण्यात हा युवा क्रिकेटर अपयशी ठरला.
त्याची झेल सोडण्याची प्रक्रिया इथेच थांबली नाही. यशस्वी जैस्वालने काही षटकांनंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर पॅट कमिन्सचा झेल सोडला. त्यावेळी तो शॉर्ट कव्हरवर क्षेत्ररक्षण करत होता. कांगारू संघ दुसऱ्या डावात पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
टीम इंडियाला दुसऱ्या डावात 300 पेक्षा जास्त धावांचं आव्हान मिळाल्यास रोहित शर्माच्या टीमसाठी ते अडचणीचं ठरेल. जर यशस्वी जैस्वालने या तिन्ही पैकी 2 तरी झेल यशस्वीपने झेलले असते तर ऑस्ट्रोलियाचा डाव 250 धावांत गुंडाळला असता आणि भारतीय संघाला विजयासाठी 250 च्या आसपास टार्गेट मिळाले असते मात्र, त्याच्या 3 झेल सोडल्याने आता हेच टार्गेट 300 पार पोहचू शकते.
हेही वाचा: