IND vs AUS : ‘भाई क्या कर रहा है तू…?” दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाल्याने रोहित शर्मावर भडकले चाहते, रोहित शर्मा होतोय तुफान ट्रोल..

 IND vs AUS 4th Test Live: भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. कांगारू संघाने भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

संघाला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कडून खूप अपेक्षा होत्या की, तो आपला खराब फॉर्म विसरून ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळेल, पण तसे होऊ शकले नाही. संपूर्ण मालिकेत धावांसाठी झगडणारा रोहित यावेळीही केवळ नऊ धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या डावाच्या सुरुवातीपासूनच नियंत्रणात असलेला रोहित अचानक कमिन्सच्या चेंडूवर शॉट घ्यायला गेला आणि स्लिपमध्ये झेलबाद झाला. मिचेल मार्शने त्याचा झेल घेतला. त्याचा डाव कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने संपुष्टात आणला. रोहित बाद झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीबाबतच्या अटकळांना पुन्हा एकदा जोर आला आहे.

 IND vs AUS: रोहित संपूर्ण मालिकेत अपयशी

 IND vs AUS : 'भाई क्या कर रहा है तू...?" दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाल्याने रोहित शर्मावर भडकले चाहते, रोहित शर्मा होतोय तुफान ट्रोल..

मुलाच्या जन्मामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या येण्याने आपली फलंदाजी बळकट होईल, अशी आशा संघाला होती, पण तसे झाले नाही. संपूर्ण मालिकेत रोहितची बॅट शांत राहिली आहे.

या मालिकेत त्याने पाच वेळा फलंदाजी केली असून त्याला केवळ 31 धावा करता आल्या आहेत. त्याच्या सततच्या खराब कामगिरीमुळे त्याचे चाहतेही निराश झाले आहेत आणि त्याच्या निवृत्तीची मागणी करत आहेत. X PLATFORM वर रोहित आता तुफान ट्रोल होत आहे. पाहूया काही ट्वीटस..


हेही वाचा:

WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

BCCI Post For jaspirt Bumrah:’जस्सी भाई…” जसप्रीत बूमराहच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयने केली बूमराह साठी विशेष पोस्ट, सोशल मिडीयावर होतेऊ तुफान व्हायरल..

Leave a Comment