IND vs ENG 2nd ODI:  अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!

IND vs ENG 2nd ODI:  भारतीय कर्णधार रोहित शर्माने  (Rohit Sharma) अखेर त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवला. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ११९ धावांची शानदार खेळी केली आणि भारताच्या चार विकेटने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्ती?

कटकमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकार मारून त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३२ वे शतक पूर्ण केले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्माने केले शानदार पुनरागमन, 486 दिवसानंतर ठोकले शतक.

रोहित शर्माने ४८७ दिवसांनंतर एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले. यापूर्वी त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावले होते. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने ३३८ दिवसांनी शतक ठोकले. त्याचे शेवटचे शतक मार्च २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत झाले होते.

सामन्यानंतर रोहित म्हणाला,

“मला फलंदाजी करणे आणि संघासाठी धावा करणे खूप आवडले. ही मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकदिवसीय सामन्यात कशी फलंदाजी करायची हे मी आधीच ठरवले होते.”

३७ वर्षीय रोहित शर्मा पुढे म्हणाला,

“एकदिवसीय क्रिकेटचा फॉरमॅट टी-२० पेक्षा वेगळा आहे आणि तो कसोटीपेक्षा लहान आहे. मला जास्त वेळ क्रीजवर राहायचे होते आणि माझे संपूर्ण लक्ष त्यावर होते. स्टंपकडे येणाऱ्या चेंडूंना कसे तोंड द्यायचे आणि अंतर कसे शोधायचे याची मी स्वतःला तयार केले होते.”

त्याने शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचेही कौतुक केले आणि म्हटले की,

“गिल हा एक उत्तम खेळाडू आहे, तो परिस्थितीला त्याच्यावर वर्चस्व गाजवू देत नाही आणि त्याची आकडेवारी हे सिद्ध करते.”

रोहित शर्माचे हे शतक एवढे भारी होते की, स्वतः इंग्लंडचा कर्णधार बटलरने रोहितच्या खेळीचे कौतुक केले..

IND vs ENG 2nd ODI:  अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!

दरम्यान, पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला,

“आम्ही चांगली फलंदाजी केली, पण ३५० धावांचा टप्पा गाठू शकलो नाही. रोहितने एक शानदार खेळी केली आणि त्याने हे यापूर्वीही केले आहे. जर आम्ही ३३०-३५० धावा केल्या असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता.

आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल.


हेही वाचा:

IND vs ENG 4th T-20 Live: कधी आणि केव्हापासून खेळवला जाणार चौथा टी-२० सामना ? या मैदानावर रंगणार ‘करो अथवा मरो’ सामना..

आशा भोसलेची नात नाही तर ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ‘मिया भाई’ बोल्ड ? मोहम्मद सिराजचे फोटो वायरल..

Leave a Comment