IND vs ENG 3rd ODI: तिसऱ्या एकदिवशीय सामन्याआधी जय शहाची मोठी घोषणा, सामन्याच्या ठीक अर्धा तास आधी होणार विशेष प्रोग्राम..!

IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ विशेष तयारीत व्यस्त आहे. सामन्यापूर्वी अहमदाबादमध्ये एक विशेष कार्यक्रम होणार आहे, ज्याची घोषणा जय शाहसह भारतीय खेळाडूंनीही केली आहे.

 IND vs ENG 3rd ODI

IND vs ENG 3rd ODI: जय शहा यांची मोठी घोषणा

भारत आणि इंग्लंड  (IND vs ENG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने आधीच मालिका जिंकली आहे. मात्र, मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी जय शाहने सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली आहे.

त्यांनी लिहिले की, २ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने, आम्हाला जागरूकता उपक्रम सुरू करण्याचा अभिमान आहे. यासह त्यांनी तिसऱ्या एकदिवशीय सामन्याआधी ‘अवयव दान’ कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत.

 

त्यांनी पुढे लिहिले की,

खेळामध्ये प्रेरणा देण्याची, एकत्र येण्याची आणि क्षेत्राबाहेर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याची शक्ती आहे. या उपक्रमाद्वारे, आम्ही सर्वांना सर्वात मोठी भेट – जीवनाची भेट देण्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्याचे आवाहन करतो. एक वचन, एक निर्णय, अनेकांचे जीव वाचवू शकतो. चला एकत्र येऊन बदल घडवूया.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शेवटचा सामना खेळायचा आहे. या संदर्भात, भारतीय संघ व्यवस्थापन त्यांच्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घेऊ इच्छिते.

अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती मिळू शकते.

IND vs ENG 3rd ODI: तिसऱ्या एकदिवशीय सामन्याआधी जय शहाची मोठी घोषणा, सामन्याच्या ठीक अर्धा तास आधी होणार विशेष प्रोग्राम..!

IND vs ENG 3rd ODI: इंग्लंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.


हेही वाचा:

IND vs ENG 2nd ODI:  अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!

Leave a Comment