IND vs ENG 3rd ODI Weather Report: भारत आणि इंग्लंड (ind vs eng) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाईल. भारतीय संघाने आधीच मालिका २-० ने जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात, टीम इंडिया क्लीन स्वीपवर लक्ष केंद्रित करेल, तर इंग्लंड कोणत्याही किंमतीत सामना जिंकून आपला सन्मान वाचवू इच्छित असेल. तिसऱ्या सामन्यात अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये..
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात हवामान कसे असेल? (IND vs ENG 3rd ODI Weather Report)
भारत आणि इंग्लंड (ind vs eng) यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. अॅक्यू वेदरच्या अहवालानुसार, १२ फेब्रुवारी रोजी तापमान ३१ अंश राहणार आहे. पावसाची शक्यता १० टक्के आहे. अशा परिस्थितीत सामन्यादरम्यान रिमझिम पाऊस पडू शकतो. आर्द्रता ३८ टक्के राहण्याचा अंदाज आहे, तर वाऱ्याचा वेग ताशी १३ किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात खेळपट्टी कसी असेल? (IND vs ENG 3rd ODI Pitch Report)
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सहसा फलंदाजांसाठी अनुकूल असते. गेल्या काही वर्षांत, येथील खेळपट्टीमुळे फलंदाजांना धावा काढण्यास मदत झाली आहे. वेगवान गोलंदाजांनाही उसळी मिळते, ज्यामुळे फलंदाजांना शॉट्स खेळणे सोपे होते. अशा परिस्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यात एक उच्च धावसंख्या असलेला सामना पाहायला मिळू शकतो.
(IND vs ENG Head-to-Head Records)
Head to Head रेकोर्ड बोलायचे झाले तर, या मैदानावर एकूण ३६ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १९ वेळा सामना जिंकला आहे. तर १७ सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.
तिसऱ्या एकदिवशीय सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट आणि मार्क वूड.
हेही वाचा:
IND vs ENG 2nd ODI: अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!