IND vs ENG: रोहित शर्मा कडे इतिहास रचण्याची संधी, तिसऱ्या एकदिवशीय सामन्यत करू शकतो अशी ऐतिहासिक कामगिरी..!

IND vs ENG:  सध्या  सुरु असलेल्हिया भारत आणि इंग्लंड  एकदिवशीय मालिकेचा अंतिम सामना उद्या म्हणजेच (12 फेब्रुवारी ) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील दोन्ही सामने जिकून मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे.

शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९० चेंडूत ११९ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. या खेळीनंतर, चाहत्यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, या सामन्यात त्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात रोहित शर्मा अहमदाबादच्या स्टेडियमवर इतिहास रचू  शकतो.. चला तर जाणून घेऊया कोणता आहे तो विक्रम..

IND vs ENG:  तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात रोहित शर्मा हा विक्रम करू शकतो.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जर रोहितने या मालिकेतील शेवटच्या सामन्यात किमान १३ धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यात ११,००० धावा करणारा जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज बनेल.

२३ जून २००७ रोजी बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून, रोहितने २६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,९८७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११,००० धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने त्याच्या २३० व्या एकदिवसीय सामन्यातील २२२ व्या डावात ११००० धावांचा टप्पा ओलांडला.

IND vs ENG 3rd ODI Weather Report: तिसऱ्या एकदिवशीय सामन्यासाठी कसे असेल अहमदाबादचे हवामान? पावसामुळे येणार व्यत्यय..

एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११,००० धावा करणारे फलंदाज (Fastest 11000 Runs in ODI)

विराट कोहली (भारत)                                २२२
सचिन तेंडुलकर (भारत)                             २७६
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया, आयसीसी)            २८६
सौरव गांगुली (भारत, आशिया)                     २८८
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)                     २९३

 हा पराक्रम करणारा तिसरा भारतीय बनू शकतो रोहित शर्मा.

IND vs ENG: रोहित शर्मा कडे इतिहास रचण्याची संधी, तिसऱ्या एकदिवशीय सामन्यत करू शकतो अशी ऐतिहासिक कामगिरी..!

जर रोहितने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले तर तो सचिन तेंडुलकर आणि कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात १०० शतके ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. यानंतर विराट कोहली येतो. त्याने आतापर्यंत ५४४ सामन्यांमध्ये ८१ शतके झळकावली आहेत.


हेही वाचा:

IND vs ENG 2nd ODI:  अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!

Leave a Comment