India vs Australia 5th Test: शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, दोन खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी?, पहा संभावित प्लेईंग 11

India vs Australia 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाचवी कसोटी सिडनी येथे उद्यापासून (03 जानेवारी) खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

IND vs AUS 5th Test: भारतीय संघाला मोठा धक्का, पाचव्या कसोटीतून बाहेर पडणार 'हा' दिग्गज खेळाडू..

जर टीम इंडिया हा सामना हरला तर त्यांच्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) फायनलचे दरवाजे बंद होतील. आता सिडनी कसोटी जिंकून टीम इंडियाला WTC फायनलच्या शर्यतीत राहायचे आहे. म्हणूनच शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही बदल होणार आहे. पाहूया शेवटच्या कसोटीसाठी कसा असू शकतो संभावित भारतीय संघ..

India vs Australia 5th Test: शुभमन गिलला मिळणर शेवटच्या कसोटीत संधी?

मेलबर्न कसोटीत शुभमन गिल खेळला गेला नव्हता. यानंतर रोहित शर्माच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि केएल राहुल नंबर-3 वर फलंदाजी करताना दिसला. आता शुभमन गिल सिडनी कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आज तो सिडनीच्या मैदानावर सराव करतांना ही दिसला. आता सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गिलचा समावेश होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या खेळावर अजूनही शंका आहे.

India vs Australia 5th Test:आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर

वेगवान गोलंदाज आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर पडला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी पत्रकार परिषदेत दुखापतीबाबत माहिती दिली. आत्तापर्यंत आकाश दीपने या मालिकेत दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 80 पेक्षा जास्त षटके टाकली आहेत.

India vs Australia 5th Test: शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, दोन खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी?, पहा संभावित प्लेईंग 11

या काळात त्याने पाच विकेट्सही घेतल्या. आता आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर पडल्यानंतर प्रसिध कृष्णा किंवा हर्षित राणा या दोघांना संधी मिळू शकते. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हर्षित राणा खेळताना दिसला होता. अशा परिस्थितीत आता प्रसिध कृष्णाची सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्याची शक्यता आहे.

India vs Australia 5th Test :टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.


हेही वाचा:

Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्त

Leave a Comment