IPL 2025 Auction Arjun Tendulkar Base Price: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावा (IPL 2025 Mega Auction)ची तयारी जवळपास आता पूर्ण झाली आहे. या महिन्यात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल2025 साठी मेगा लिलाव पार पडणार आहे, ज्यात 600हून अधिक खेळाडूंवर 10 संघांकडून बोली लावण्यात येणार आहे.

लिलावाआधी मुंबई इंडियन्सने (MI) रिलीज केल्यानंतर, युवा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आता मेगा लिलावासाठी सज्ज झाला आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणाऱ्या मेगा लिलावासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. चार सीझन आयपीएलचा भाग असलेल्या अर्जुनने यंदाच्या मेगा लिलावासाठी आपली किंमत वाढवली आहे.
IPL 2025 Auction Arjun Tendulkar Base Price: किती आहे अर्जुन तेंडुलकरची मूळ किंमत?
अर्जुनने या लिलावात 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह प्रवेश केला आहे. त्याने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली होती तेव्हा त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. मुंबईने सलग 3 वर्ष त्याला मूळ किमतीमध्ये संघाचा हिस्सा बनवले होते.
अर्जुन तेंडुलकरचा आजवरचा आयपीएल प्रवास.
IPL 2020 मध्ये अर्जुन पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून UAE ला गेला होता. IPL 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुनला 30 लाख रुपयांना पुन्हा करारबद्ध केले. अर्जुनला 2023 मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. येथे त्याला संपूर्ण मोसमात चार सामने खेळण्याची संधी मिळाली.
मात्र, गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) तो एकच सामना खेळू शकला. मुंबईकडे सध्या एक राईट टू मॅच (RTM) कार्ड शिल्लक आहे, त्यामुळे अर्जुनचा फॉर्म लक्षात घेता संघ त्याला पुन्हा समाविष्ट करू शकतो.

IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी अर्जुन मजबूत फॉर्ममध्ये आहे आणि रणजी ट्रॉफीमध्ये गोव्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत, त्याचा सध्याचा फॉर्म त्याला मेगा लिलावात चांगली रक्कम मिळवून देऊ शकतो.
यावेळी मुंबईने आपले प्रमुख खेळाडू कायम ठेवले आहेत. संघ व्यवस्थापनाने ज्या खेळाडूंना कायम ठेवले आहे त्यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांचा समावेश आहे.
यावेळी संघाने आधीच पुष्टी केली आहे की, कर्णधारपदात कोणताही बदल होणार नाही आणि हार्दिक आयपीएल 2025 मध्ये संघाचे नेतृत्व करेल. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्सने 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली त्यांचा सर्वात खराब आयपीएल हंगाम खेळला, जिथे ते पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होते.