ipl 2025 mega auction live: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव आज जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होत आहे. मेगा लिलावात एकूण 577 खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 विदेशी खेळाडू आहेत. या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत.
यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. असे काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ 30 कोटी रुपये देखील खर्च करू शकतात. आयपीएलच्या दहा संघांकडे 641.5 कोटी रुपये आहेत, तर पंजाब किंग्जचे सर्वाधिक बजेट 110.5 कोटी रुपये आहे.
ipl 2025 mega auction live: पहिल्या दोन खेळाडूंवर लागली बोली,कुणाला किती कोटी?
अर्शदीप सिंग पंजाबमध्येच!
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग पंजाबमध्येच राहणार आहे. टीमने त्याच्यासाठी 18 कोटी रुपये खर्च करून आरटीएम कार्ड वापरले आहे.
वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गुजरातच्या ताफ्यात.
गुजरात टायटन्सने वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला १०.७५ कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
लिलावाचे पुढील अपडेट्स वाचण्यासाठी कनेक्ट करा. WWW.SHARPUPDATES.COM