IPL 2025 Mega Auction Live updates: आज कोणत्या खेळाडूचे चमकणार नशीब? कोट्यावधींची होणार उधळण. किती वाजता सुरु होणार लिलाव? आणि कुठे पाहू शकणार लाईव्ह

IPL 2025 Mega Auction Live updates: बहुचर्चित आयपीएल 2025 (ipl2025) च्या मेगा लिलावाची वेळ आता जवळ आली आहे. बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे आज आयपीएल 2025 साठी नोंदणी केल्या गेलेल्या सर्व खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

IPL 2025 Auction Arjun Tendulkar Base Price

हा लिलाव आज आणि उद्या दोन दिवसात पार पडणार आहे. लिलावाचे लाइव्ह प्रक्षेपण सुरु होण्यापूर्वी या लिलावाबाबत क्रिकेट प्रेमींच्या मनात काही प्रश्न आहेत त्यांची सविस्तर उत्तरे आम्ही येथे तुम्हाला देत आहोत.

  • IPL 2025 Mega Auction Live updates: किती वाजता सुरु होणार आयपीएल 2025 मेगा लिलाव?

आयपीएल 2025 लिलाव हा आज म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 वाजतापासून सुरु होणार आहे. हा लिलाव 2 दिवस चालणार आहे आणि प्रत्येक दिवशी 250+ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

  • आयपीएल 2025  मेगा लिलावामध्ये (PL 2025 Mega Auction) किती खेळाडूंनी नाव नोंदवले आहे?

आयपीएलच्या या महा लिलावासाठी भारतीय आणि विदेशी मिळून असे सर्व 557 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. यात 80% खेळाडू हे भारतीय तर उर्वरित विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

  • आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी (PL 2025 Mega Auction)कोणत्या संघाकडे किती रक्कम उपलब्ध आहे?

खालील टेबल Content मध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या संघाकडे लिलावामध्ये बोली लावण्यासाठी किती पर्स (IPL 2025 Mega Auction All team’s Purse) बाकी आहे.

 

IPL 2025 Mega Auction teams purse

 

  • आयपीएल 2025 मेगा लिलावात कोणता खेळाडू ठरू शकतो सर्वाधिक महागडा खेळाडू?

आयपीएल 2025 चा मेगा लिलाव जसा जसा जवळ येत होता ,तस तसे या लिलावात सर्वांत महागडा खेळाडू कोण (IPL 2025 Most Expensive player) असा प्रश्न सर्वच क्रिकेट प्रेमींना पडत होता.

आयपीएलच्या दिग्गजांच्या सर्वेनुसार यावर्षीच्या लिलावात रिषभ पंत किंवा श्रेयस अय्यर या दोघांपैकी एकजण सर्वांत महागडा खेळाडू होण्याचा मान मिळवू शकतो. या दोघांना अंदाजे 25 कोटीहून अधिक रक्कम मिळू शकते.

IPL 2025 Mega Auction Live: आज कोणत्या खेळाडूचे चमकणार नशीब? कोट्यावधींची होणार उधळण. किती वाजता सुरु होणार लिलाव? आणि कुठे पाहू शकणार लाईव्ह

आता हा अंदाज किती खरा ठरतो, हे पुढील एक दोन तासात आपल्याला कळेलच. आयपीएल लिलावाचेचे सर्व अपडेटस तुम्हाला येथे वेळोवेळी मिळतीलच..


Leave a Comment