ipl 2025 Mega Auction Live: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब चमकले, तर अनेक खेळाडू न विकलेही गेले. दुसऱ्या दिवशी, भारताव्यतिरिक्त, आयपीएल 2025 साठी अनेक परदेशी खेळाडूंची विक्री होऊ शकली नाही.
लिलावाच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत, श्रेयस अय्यर,व्यंकटेश अय्यर,युजी चहल, अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लागली. रिषभ पंत तर आयपीएलच्या लिलावातील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला त्याला. लखनौने तब्बल 27 कोटी रु देऊन संघात सामील केले.
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. यात डेव्हिड वार्नर सारख्या दिग्गज खेळाडूचा देखील समावेश आहे.
ipl 2025 Mega Auction: नवीन उल हक राहिला लिलावात अनसोल्ड, खरेदीदार न मिळाल्यामुळे संपले करीर.
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी एकेकाळी विराट कोहलीचा कट्टर विरोधक असलेल्या नवीन उल हकलाही आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
75 लाखाच्या बेस प्राईस सह नवीन लिलावात उतरला होता मात्र सर्वच संघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे आयपीएल करिअर संपले. पुढील 3 वर्ष कोणत्याही खेळाडूवर आता बोली लावली जाणार नाही. त्यामुळे त्याचे आयपीएल करिअर संपल्यात जमा झाले आहे.
हेही वाचा: