IPL 2025 MI vs CSK: मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी सुर्यकुमार यादवसमोर मोठे आव्हान, संघावरील हा डाग पुसू शकेल सूर्या?

IPL 2025 MI vs CSK: मुंबई इंडियन्स २३ मार्चपासून आयपीएल २०२५ सीझन-१८ मध्ये आपला प्रचार सुरू करणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जशी असेल. या सामन्यात हार्दिक पंड्या नाही तर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. आता सूर्यकुमार यादवसमोर मुंबई इंडियन्सवरील डाग पुसण्याचे कठीण आव्हान असेल.

IPL 2025 MI vs CSK: सूर्यकुमार यादव समोर असणार हे मोठे आव्हान  !

२०१२ पासून आजपर्यंत, मुंबई इंडियन्सना आयपीएलमध्ये कधीही त्यांचा पहिला सामना जिंकता आलेला नाही. आयपीएल २०१२ पासून, मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना खेळलेल्या प्रत्येक हंगामात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, मुंबई इंडियन्सवरील हा डाग पुसून टाकण्यासाठी सूर्यकुमार यादवसमोर आता कठीण आव्हान असणार आहे.

 आयपीएल 2024 मध्ये गुणतालिकेत  सर्वांत खालच्या तळाला होता मुंबईचा संघ.

आयपीएल २०२४ मध्ये ५ वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची अवस्था खूपच वाईट होती. मुंबई इंडियन्सला हंगामातील पहिला विजय मिळविण्यासाठी 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले होते.

IPL 2025 MI vs CSK: मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी सुर्यकुमार यादवसमोर मोठे आव्हान, संघावरील हा डाग पुसू शकेल सूर्या?

गेल्या हंगामात झालेल्या चुकीमुळे हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पहिल्या सामन्यातून बाहेर पडणार आहे. दुसरीकडे, संघाचा सर्वात धोकादायक गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. अशा परिस्थितीत, बुमराह कोणत्या तारखेला मुंबई इंडियन्समध्ये परतेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.  बुमराह एक किंवा दोन सामने गमावू शकतो. आता या हंगामात मुंबइ कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


हेही वाचा:

Champions Trophy आधी रोहित शर्माला जखमी करण्याचा डाव कुणी रचला, कर्णधार रोहित ने स्वतः केला खळबळजनक खुलासा..

Leave a Comment