IPL 2025 Mumbai Indians Full Squad: IPL 2025 लिलावानंतर असा झाला आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ, प्लेईंग 11 मध्ये कोणाचा होणार समावेश, वाचा सविस्तर..

IPL 2025 Mumbai Indians Full Squad: आयपीएल 2025 साठी 24 आणि  25 नोव्हेंबर रोजी महा लिलाव पार पडला. या लिलावात सर्वच 10 संघांनी आपापला खेळाडू कोटा पूर्ण करण्यासाठी खेळाडूंवर करोडोंची बोली लावली.

या लिलावात रिषभ पंत सर्वाधिक पैसे कमावणारा (Most Expensive Player of IPL 2025) खेळाडू ठरला. त्यापाठोपाठ श्रेयस अय्यर (26.75 कोटी), व्यंकटेश अय्यर (23.75 कोटी), अर्शदीप सिंग (18 कोटी), युज वेंद्र चहल (18 कोटी) हे सर्वांत महागडे खेळाडू ठरले.

IPL 2025 Mumbai Indians Full Squad
Image Courtesy: MUMBAI INDIANS

आयपीएल 2025 चा मेगा लिलाव संपल्यानंतर आता सर्वच क्रिकेट प्रेमी आपापल्या संघाने कोणते खेळाडू विकत घेतलेत आणि मैदानात कोणती प्लेईग 11उतरेल, याचे आकलन करत आहे.

आज आम्ही या ठिकाणी मुंबई इंडियन्सने त्यांचा संघ कसा बनवला आहे? (IPL 2025 Mumbai Indians Squad) आणि आयपीएल 2025 च्या सामन्यांसाठी कोणता अंतिम 11 जणांचा (MI PLAYING 11 for IPL 2025) संघ मैदानात उतरू शकतो ? याचे आकलन करणार आहोत.

IPL 2025: लिलावानंतर असा आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ!( IPL 2025 Mumbai Indians Full Squad)

  • मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेलं खेळाडू (MI retained player list)
  • जसप्रीत बुमराह (18 कोटी)
  • सूर्यकुमार यादव (16.35 कोटी)
  • हार्दिक पांड्या (16.35 कोटी)
  • रोहित शर्मा (16.30 कोटी)
  • तीलक वर्मा (8 कोटी)

  • मुंबई इंडियन्सने लिलावात विकत घेतलेले खेळाडू (Mi Bought Players list in IPL 2025 Mega Auction)

  1. ट्रेंट बोल्ट (12.50 कोटी)
  2. नमन धीर (5.25 कोटी)
  3. रॉबिन मिंज (65 लाख)
  4. कर्ण शर्मा (50 लाख)
  5. रायन रिकेल्टन (रु. 1 कोटी)
  6. दीपक चहर (रु. 9.25 कोटी)
  7. अल्लाह गझनफर (रु. 4.80 कोटी)
  8. विल जॅक्स (रु. 5.25 कोटी)
  9. अश्वनी कुमार (रु. 30 लाख)
  10. मिशेल सँटनर (रु. 2 कोटी)
  11. रीस टोपले (रु. 75 लाख)
  12. कृष्णन श्रीजीथ (रु. 30 लाख) )
  13. राज अंगद बावा (रु. 30 लाख)
  14. सत्यनारायण राजू (रु. 30 लाख)
  15. बेव्हॉन जेकब्स (रु. 30 लाख)
  16. अर्जुन तेंडुलकर (रु. 30 लाख)
  17. लिझाद विल्यम्स (रु. 75 लाख)
  18. विघ्नेश पुथूर (रु. 30 लाख).

हेही वाचा: IPL 2025 Auction Arjun Tendulkar Base Price: आयपीएल 2025 च्या लिलावासाठी सचिनच्या पुत्राने वाढवली किंमत, मुंबई इंडियन्स पुन्हा लावणार बोली?

IPL 2025 Mumbai Indians Full Squad: IPL 2025 लिलावानंतर असा झाला आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ, प्लेईंग 11 मध्ये कोणाचा होणार समावेश, वाचा सविस्तर..

  • IPL 2025 साठी मुंबई इंडियन्स संघात कोणते किती खेळाडू?

फलंदाज: सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, टिळक वर्मा, बेव्हॉन जेकब्स.
यष्टिरक्षक: रॉबिन मिन्झ, रायन रिकेल्टन, कृष्णन श्रीजीथ.
अष्टपैलू: हार्दिक पंड्या, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर.
वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, अश्वनी कुमार, रीस टोपली, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर, लिझाद विल्यम्स.
फिरकीपटू: कर्ण शर्मा, अल्लाह गझनफर.

  • आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सची संभावित प्लेईंग 11 (Probable Playing 11 of Mumbai Indians for IPL 2025)

रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, रायन रिकेल्टन, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.


Leave a Comment