IPL 2025: दिल्लीला सोडतांना ऋषभ पंत भावूक, सोशल मिडीयावर पंतने केलेली पोस्ट होतेय तुफान व्हायरल..

IPL 2025, ऋषभ पंत : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) गेली अनेक वर्षे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता पण, यावेळी फ्रँचायझीने या यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधाराला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने(LSG) पंतला मोठी रक्कम देऊन  विकत घेतले आहे.

most Expensive Player in ipl History: मिचेल स्टार्क,श्रेयस अय्यरला मागे टाकत 'रिषभ पंत' ठरला आयपीएलच्या इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू, मिळाले तब्बल एवढे कोटी..!
image Courtesy: SHARPUPDATES

दिल्ली कॅपिटल्सलाही (DC) पंत पुन्हा हवा होता पण शेवटी दोघांच्या बोली युद्धात लखनौसमोर दिल्लीला हात टेकावे लागले. यासह पंत आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. LSG ने या खेळाडूला 27 कोटींना खरेदी केले आहे. 

यादरम्यान आता ऋषभ पंतने आली जुनी टीम दिल्ली (DC) साठी एक इमोशनल मेसेज शेअर केला आहे. जो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

IPL 2025: दिल्लीला सोडतांना ऋषभ पंत भावूक, सोशल मिडीयावर पंतने केलेली पोस्त होतेय तुफान व्हायरल..

IPL 2025 दिल्ली कॅपिटल्सचा निरोप घेताना ऋषभ पंत भावूक, शेअर केली पोस्ट!

या लिलावाआधी ऋषभ पंत दीर्घकाळापासून दिल्ली कॅपिटल्सशी नाळ जोडून होता. दिल्लीच्या चाहत्यांचेही पंतवर खूप प्रेम होते. आता त्याच्या संघात अचानक झालेला बदल दिल्लीच्या चाहत्यांसाठीही थक्क करणारा होता. दिल्ली कॅपिटल्सचा निरोप घेताना पंतने आता त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी खूप भावनिक आहे.

 

या पोस्टमध्ये पंतने लिहिले की,

दिल्ली कॅपिटल्समधील माझा प्रवास खूप संस्मरणीय राहिला आहे. मी इथे किशोरवयात आलो होतो. दिल्ली कॅपिटल्समध्ये आल्यानंतर मी खूप काही शिकलो आहे. आम्ही 9 वर्षे एकत्र वाढलो आणि ज्या गोष्टीने सर्वात अविस्मरणीय बनवले ते तुम्ही चाहते आहात… तुम्ही मला नेहमीच पाठिंबा दिला, जो मी नेहमी माझ्या हृदयात ठेवेन..Good BY DC

IPL 2025: दिल्लीला सोडतांना ऋषभ पंत भावूक, सोशल मिडीयावर पंतने केलेली पोस्त होतेय तुफान व्हायरल..

ऋषभ पंतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आता पंत आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. एलएसजीही त्याला नवा कर्णधार म्हणून निवडू शकते, अशी अपेक्षा आहे. केएल राहुलला सोडल्यानंतर एलएसजी नवीन कर्णधाराच्या शोधात होती ज्याची पूर्तता ऋषभ पंतच्या माध्यमातून होतांना दिसतेय.

तब्बल 27 कोटी रु घेऊन LSG मध्ये सामील झालेला ऋषभ पंत आता संघाच्या अपेक्षेवर खरा उतरतो का नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

Leave a Comment