IPL 2025 Schedule: जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) कडे आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. स्पर्धा संपताच चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळणार आहे.
अशाप्रकारे, क्रिकेट चाहत्यांना पुढील काही महिने क्रिकेटचा सतत डोस मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग चा १८ वा हंगाम २१ मार्च २०२५ पासून सुरू होईल. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र आता बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाबद्दल मोठी अपडेट शेअर केली आहे.
पुढील 3/4 दिवसांत जाहीर होणार IPL 2025 Schedule?
मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय पुढील सात दिवसांत आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते. बीसीसीआयने संपूर्ण कार्यक्रम तयार केला आहे. Champions Trophy ला सुरवात होण्याच्या एक दिवस आधी किंवा Champion Trophy दरम्यान बीसीसीआय आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर करू शकते. आता चाहते या दिवसाची आतापासूनच वाट पाहत आहेत
यापूर्वी, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पुष्टी केली होती की, लीग २१ मार्चपासून पूर्ण उत्साहाने सुरू होईल. लीग फायनल २५ मे रोजी होण्याची अपेक्षा आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पहिले दोन प्लेऑफ सामने होतील, तर कोलकात्यातील ईडन गार्डन्स हे दुसरे प्लेऑफ आणि अंतिम सामना खेळवण्याचे ठिकाण असेल, असे वृत्त आहे. गेल्या वर्षी जेद्दाहमध्ये झालेल्या मेगा लिलावापूर्वी, आयपीएल २०२५ ची सुरुवात तारीख १४ मार्च असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु आता हे निश्चित झाले आहे की आगामी हंगाम २१ मार्च २०२५ पासून सुरू होईल आणि २५ मे २०२५ पर्यंत चालेल.
हेही वाचा:
IND vs ENG 2nd ODI: अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!