Jasprit Bumrah Injury Update:  इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार की नाही ? WTC फायनलआधी बूमराहच्या इंजरीबाबत मोठी अपडेट समोर..

 Jasprit Bumrah Injury Update:  टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सिडनी कसोटीत दुखापत ग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आणि अंतिम सामन्यासह ऑस्ट्रोलियाने तब्बल 10वर्षानंतर बॉर्डर-गावास्कर ट्रॉफी देखील भारतीय संघाच्या हातून पळवली.

या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 10 धावा केल्यानंतर बुमराहला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. सामन्याच्या मध्यावर बुमराहला रुग्णालयात जावे लागले. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने सांगितले होते की, बुमराहच्या पाठीत दुखत होते, त्यामुळे त्याला गोलंदाजी सोडून मैदानाबाहेर जावे लागले.  IND vs AUS, Sunil Gawaskar Angry: ज्यांच्या नावावर ट्रॉफी त्यांचा अपमान केल्याने ऑस्ट्रोलीयावर भडकले सुनील गावस्कर, नक्की काय प्रकरण?

  Jasprit Bumrah Injury Update: ऑस्ट्रोलियाच्या भूमीवर बूमराहचा डंका, रचला अनोखा इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय..!

आता भारतीय संघाला पुढील मालिका ही इंग्लंड विरुद्ध खेळायची आहे, त्याआधी भारतीय संघाकडून जसप्रीत बूमराहच्या दुखापती बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे..

 Jasprit Bumrah Injury Update: भारताला इंग्लंडसोबत वनडे-टी-20 मालिका खेळणार.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर आता टीम इंडियाला इंग्लंडसोबत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या दोन मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. आता इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह फिट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड मालिकेनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल, त्याआधी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतावे अशी टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांची इच्छा आहे.

 Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बूमराह कधी उतणार मैदानात?

बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जसप्रीत बूमराहची तब्येत आता ठीक असून तो हळू हळू रिकव्हर होत आहे. तरीदेखील इंग्लंड विरुद्धच्या एकदिवशीय आणि टी-20 मालिकेसाठी तो भारतीय संघाचा हिस्सा नसणार आहे. जसप्रीत बूमराहचे मैदानात पुनरागमन हे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये होऊ शकते.

 Jasprit Bumrah Injury Update:  इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार की नाही ? WTC फायनलआधी बूमराहच्या इंजरीबाबत मोठी अपडेट समोर..

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. बुमराह या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. मालिकेतील 5 सामन्यात गोलंदाजी करताना बुमराहने 32 विकेट घेतल्या. त्यामुळे तो प्लेअर ऑफ द सिरीज देखील निवडला गेला. या मालिकेत बुमराहने तीनदा 5 विकेट घेतल्या.

या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 76 धावांत 6 विकेट्स घेणे. याशिवाय बुमराह 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसला होता.


हेही वाचा:

4,4,4,0,4,4:..! युवा यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला धुतले, डावाच्या पहिल्याच षटकात ठोकल्या एवढ्या धावा..

Leave a Comment