LSG vs DC: भारतीय विकेटकीपर-फलंदाज आणि स्टार फलंदाज केएल राहुल (Kl Rahul) ने मंगळवारी (२२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) कडून खेळताना एक ऐतिहासिक विक्रम रचला. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा फलंदाज बनला आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राहुलला हे यश मिळवण्यासाठी ५१ धावांची आवश्यकता होती आणि त्याने १८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत हा टप्पा गाठला.
LSG vs DC: केलएल राहुलने डेव्हिड वॉर्नरचा मोडला विक्रम !
आयपीएलच्या १३९ व्या सामन्यात राहुलने त्याच्या १३० व्या डावात ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला, ज्याने १३५ व्या डावात हा आकडा गाठला होता. आता तो आयपीएल मध्ये सर्वांत जलद 5000 धावा करणारा ठरला पहिला गोलंदाज.
आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे फलंदाज
खेळाडू संघ (आतापर्यंत खेळलेला) डाव
१ केएल राहुल आरसीबी / एसआरएच / पंजाब / एलएसजी / डीसी १३०*
२ डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स / सनरायझर्स हैदराबाद १३५
३ विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १५७
४ एबी डिव्हिलियर्स दिल्ली / रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १६१
5 शिखर धवन दिल्ली / मुंबई / हैदराबाद / पंजाब 168
हेही वाचा:
IND vs AUS Live: यशस्वी जैस्वालची मोठी चूक, ठरू शकतो भारतीय संघाच्या पराभवाचा विलन…