Rajasthan Royals Squad For IPL 2025: आयपीएल 2025 चा दोन दिवशीय महा लिलाव आता संपला आहे. या लिलावात सर्वच 10 संघांनी चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे.
राजस्थान रॉयल्स (RR) हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 च्या आवृत्तीचा विजेता संघ आहे. या संघाने सुद्धा आयपीएल 2025 साठी चांगली टीम तयार केली आहे.
IPL 2025 च्या आवृत्तीसाठी, स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन राजस्थान फ्रँचायझीचे नेतृत्व करत राहील.सॅमसनच्या नेतृत्वाखाली,आरआरने आयपीएल 2024 हंगामाच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यावेळी तिला विजयाचा टप्पा गाठायचा आहे.
Rajasthan Royals Squad For IPL 2025: आयपीएल लिलावात जाण्यापूर्वी कशी होती राजस्थानची तयारी?
राजस्थान रॉयल्सने गेल्या काही मोसमात काही चांगली कामगिरी केली असली तरी, त्यांना पूर्ण फॉर्म मिळवून दुसऱ्यांदा आयपीएल जिंकता आलेले नाही. IPL 2025 मेगा लिलावासाठी राजस्थान रॉयल्सकडे कोणतेही राईट टू मॅच (RTM) कार्ड शिल्लक नव्हते कारण त्यांनी संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा यांना कायम ठेवले आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी त्याच्याकडे 41 कोटी रुपये होते. हे 41 कोटी रु वापरून त्यांनी खालील खेळाडूंची खरेदी केली आहे.
Your Royals of 2025. Built. Assembled. RReady! 💗🔥 pic.twitter.com/omIXIDQsF6
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 25, 2024
आयपीएल 2025 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने खरेदी केलेले खेळाडू. (RR bought Players in IPL 2025 mega Auction)
- जोफ्रा आर्चर (12.50 कोटी)
- वानिंदू हसरंगा (5.25 कोटी)
- महेश थेक्षाना (4.40 कोटी)
- आकाश मधवाल (12 कोटी)
- कुमार कार्तिकेय (30 लाख)
- तुषार देशपांडे (6.5 कोटी)
- नितीश राणा (4.2 कोटी)
- शुभम दुबे (80 लाख)
- युद्धवीर सिंग (35 लाख)
- फजलहक फारुकी (2 कोटी)
- वैभव सूर्यवंशी (रु. 2 कोटी)
- क्वेना म्फाका (INR 1.50 कोटी)
- कुणाल राठोड (INR 30 लाख)
- अशोक शर्मा (INR 30 लाख).
- खर्च केलेली रक्कम: रु. 119.70
आयपीएल 2025 लिलावापूर्वी राजस्थानने कायम ठेवलेले खेळाडू (RR Retained Player list for IPL 2025)
संजू सॅमसन,
यशस्वी जैस्वाल,
रायन पराग,
ध्रुव जुरेल,
शिमरॉन हेटमायर,
संदीप शर्मा
मेगा लिलावानंतर राजस्थान रॉयल्सकडे शिल्लक: 0.30 कोटी रुपये
लिलावात राजस्थानने भरलेले स्लॉट: 20/25
हेही वाचा: