most Expensive Player in ipl History: मिचेल स्टार्क,श्रेयस अय्यरला मागे टाकत ‘रिषभ पंत’ ठरला आयपीएलच्या इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू, मिळाले तब्बल एवढे कोटी..!

most Expensive Player in ipl History: आयपीएल 2025साठी आज सौदी अरेबियामध्ये खेळाडूंवर बोली लावली जात आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंवर अक्षरशा पैश्याचा पाउस पडत आहे.

most Expensive Player in ipl History: प्रथम श्रेयस अय्यरवर लागली 26.75 करोडची बोली!

 most Expensive Player in ipl History: IPL 2025 Mega Auction Live: आज कोणत्या खेळाडूचे चमकणार नशीब? कोट्यावधींची होणार उधळण. किती वाजता सुरु होणार लिलाव? आणि कुठे पाहू शकणार लाईव्ह
most Expensive Player in ipl History

आयपीएल लीलावत श्रेयस अय्यरचे नाव तिसऱ्याच क्रमांकावर असल्यामुळे त्याच्यावर सर्वच संघांनी बोली लावण्यात इंटरेस दाखवला परिणामी श्रेयस अय्यर 25 करोडहून वर बोली गेली. शेवटी पंजाब किंग्सने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला एकूण 26.75 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली होती. मात्र पुढच्याच खेळाडूने श्रेयसचा हा विक्रम मोडीत काढला आहे तो खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा स्टार विकेट कीपर’ रिषभ पंत’

most Expensive Player in ipl History:  रिषभ पंतवर लागली तब्बल 27 करोडची विक्रमी बोली.!

श्रेयस अय्यर नंतर लीलावत रिषभ पंतचे नाव पुकारण्यात आले. ज्यावर संपूर्ण संघांनी पुन्हा एकदा इंटरेस दाखवला. रिषभ साठी हैद्राबाद आणि लखनौ, पंजाब मध्ये मोठ बोली युद्ध चालले शेवटी लखनौने रिषभ वर 22.75 करोडची बोली लावली.

त्यानंतर दिल्ली केपिटलने RTM कॉल स्वीकारला ज्यामुळे लखनौला त्यांची शेवटची अंतिम ऑफर द्यावी लागली. आणि लखनौने रिस्क घेत रिषभ साठी ततब्बल 27 करोडची बोली लावली.

एक वेळ दिल्ली ही ऑफर स्वीकारते की काय?असं वाटत असतांना दिल्लीने मात्र RTM चा वापर करण्यास नकार दिला आणि रिषभ पंत लखनौच्या संघात दाखल झाला..

most Expensive Player in ipl History: मिचेल स्टार्क,श्रेयस अय्यरला मागे टाकत 'रिषभ पंत' ठरला आयपीएलच्या इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू, मिळाले तब्बल एवढे कोटी..!

अश्या रीतीने  रिषभ पंत हा  आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनला आहे. त्याच्याखाली श्रेयस अय्यर (26.75करोड), मिचेल स्टार्क (24.75 करोड),व्यंकटेश अय्यर (23.75 करोड) यांचा समावेश आहे. रिषभचा विक्रम आता उद्याच्या दिवशी होणाऱ्या लिलावात कुणी मॉडेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Comment