रोहित शर्मा: भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी अलीकडचा काळ चांगला नाही. प्रथम, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) 3-0 असा पराभव केला.
आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. एवढेच नाही तर WTC 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून ही भारतीय संघ जवळपास बाहेर पडला आहे.
मेलबर्न कसोटीतील पराभवामुळे रोहित शर्माच्या नावे झाला लज्जास्पद विक्रम.
यादरम्यान मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यातील पराभवासह हिटमॅनच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. आतापर्यंत फक्त दोन भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर हा कलंक आहे. या यादीत पहिले नाव आहे ते सचिन तेंडुलकरचे, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते.
एका हंगामात 5 कसोटी सामने गमावणार रोहित शर्मा ठरला दुसरा भारतीय कर्णधार..
रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा कर्णधार ठरला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने एका हंगामात पाच कसोटी सामने गमावले आहेत. प्रथम, टीम इंडियाला घरच्या भूमीवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर होती.
Time up!
Retire & Move on from Red ball if you both have any shame left. #INDvsAUS pic.twitter.com/VCc94lthkq
— Roshan Rai (@RoshanKrRaii) December 30, 2024
यानंतर, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली असे घडले होते. ही घटना 1999-2000 मधील आहे.
सिडनी कसोटी रोहित शर्माचे भविष्य ठरवेल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत आमनेसामने येतील. हा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंड या शानदार सामन्याचे आयोजन करणार आहे. हा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्माचे भवितव्यही ठरवेल की तो भारतीय संघात राहणार की नाही. जर या सामन्यात टीम इनइंडियाचा पराभव झाला तर भारत WTC फायनलच्या शर्यतीतून तर बाहेर पडेलच, शिवाय रोहित शर्माला सुद्धा निवृत्ती घ्यावी लागणार, हे जवळपास निच्छित आहे.
हेही वाचा: