मुंबईकर ‘श्रेयस अय्यर’वर पैश्याचा पाऊस, ठरला आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू, किती करोड?

 Shreyas Iyer IPL 2025 Auction price: सध्या जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयपीएल 2025 साठी खेळाडूंवर बोली लावली जात आहे, सर्व संघ श्रेयस अय्यरसाठी मैदानात उतरताना दिसले, जो मागील हंगामातील विजेत्या संघाचा कर्णधार होता.

अशा स्थितीत यावेळी प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी चाळीसच्या बोलीवर बराच काळ बाजी मारली. पंजाबने श्रेयसचा आपल्या कॅम्पमध्ये समावेश केला आहे.

 Shreyas Iyer IPL 2025 Auction price: श्रेयस अय्यर ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला एकूण 26.75 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे. आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे. गेल्या मोसमात मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले होते.

एवढी मोठी रक्कम देऊन केकेआरने त्याला आपला जोडीदार बनवले. पण यावेळी लिलावात श्रेयस अय्यरने तो विक्रम मोडीत काढला आणि आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू (most Expensive player of Ipl history)  ठरला आहे.


Leave a Comment