4,4,4,0,4,4:..! युवा यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला धुतले, डावाच्या पहिल्याच षटकात ठोकल्या एवढ्या धावा..

सिडनीच्या मैदानावर बोर्डर गावस्कर ट्रॉफी (BHT) चा शेवटचा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघाच्या पहिल्या पाऱ्या पूर्ण झाल्या असून दुसऱ्या डावाला सुरवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सिडनीकसोटीमध्ये पुन्हा एकदा मिचेल स्टार्क आणि यशस्वी जैस्वाल मध्ये टक्कर पाहायला मिळाली.

सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि केएल राहुल (KL Rahul) या जोडीने भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान यशस्वीने पहिल्याच षटकात एक नाही, दोन नव्हे तर चार चौकार मारून कांगारू वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला चांगलेच धुतले.

यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) ने मिचेल स्टार्कला धुतले, पहिल्याच षटकात ठोकले 5 चौकार..

जैस्वालने प्रथम स्लिप कॉर्डनवर शॉर्ट आणि वाईड चेंडू ला चौकार मारला. पुढच्या दोन चेंडूंवर त्याने आणखी दोन कट शॉट्स खेळले आणि चौकार लगावले. त्यानंतर स्टार्कने ऑफ-स्टंपच्या बाहेर पूर्ण चेंडू टाकला, जो जैस्वालने अतिरिक्त कव्हरवर टाकून चौथा चौकार मारला.

यशस्वी जैस्वाल ठरला कसोटीच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू.

यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal)स्टार्कच्या एकाच षटकात चार चौकार मारून मोठा विक्रम केला आहे. आता तो कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

दुसरीकडे, हे स्टार्कचे त्याच्या कारकिर्दीतील घरच्या कसोटीतील सर्वात महागडे ओपनिंग ओव्हर ठरले. यापूर्वी 2022 मध्ये स्टार्कने कसोटीच्या पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या होत्या.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे कांगारू संघ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या 181 धावांवर गारद झाला. संघासाठी पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने पहिल्या सामन्यात ५७ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीत पाच चौकारांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियाचा संघ १८१ धावांत सर्वबाद झाल्याने भारताला पहिल्या डावात चार धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ 145 धावांनी समोर आहे.


IND vs AUS 5th test live: टीम इंडियाला मोठा धक्का, चालू सामन्यातून जसप्रीत बूमराह हॉस्पिटलमध्ये भरती; नक्की काय झाले बूमराहला?

Leave a Comment