यशस्वी जैस्वाल बाद नसतांना देखी दिले बाद? थर्ड अंपायरच्या निर्णयाने नवा वाद, दीग्गज भारतीय खेळाडूंसह भडकले चाहते..

Yashasvi Jaiswal Wicket Controversy:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. पाचव्या दिवशी यशस्वी जैस्वाल शानदार फलंदाजी करत होती, मात्र तिसऱ्या पंचाच्या निर्णयामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले.

जयस्वालच्या विकेटवर बराच गदारोळ पाहायला मिळत आहे. जयस्वालच्या विकेटबाबत तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडूही संतापलेले दिसले.

Yashasvi Jaiswal Wicket Controversy: यशस्वी नॉट आऊट होता का?

ऑस्ट्रेलियासाठी डावातील 71वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला तेव्हा जयस्वालने त्याच्या एका चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हातात गेला. ज्यावर ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार अपील केले पण अंपायरने नॉट आऊट दिला. यानंतर कमिन्सने थर्ड अंपायरची मदत घेतली.

Yashasvi Jaiswal Wicket Controversy: यशस्वी जैस्वाल बाद नसतांना देखी दिले बाद? थर्ड अंपायरच्या निर्णयाने नवा वाद, दीग्गज भारतीय खेळाडूंसह भडकले चाहते..

तिसऱ्या पंचाने बराच वेळ तपासणी केली, अल्ट्रा एजमध्ये स्पाइक नसला तरी, जैस्वालच्या ग्लोव्हजवळून चेंडू गेल्यावर मागे गेल्यानंतर चेंडूचा कोन बदलला. स्निको मीटरवर कोणतेही रीडिंग नव्हते, तरीही जयस्वालला बाद घोषित करण्यात आले.

थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे भारतीय चाहते खूपच निराश दिसत आहेत. जयस्वाल लाही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता आणि त्यांना निराश होऊन बाहेर जावे लागले.

थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर भारतीय चाहते चांगलेच संतापलेले दिसत आहेत. या डावात यशस्वी जैस्वालच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती आणि तो आपल्या शतकाच्या अगदी जवळ होता. अशा परिस्थितीत चाहते सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करून आपला राग काढत आहेत.

 


हेही वाचा:

WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

BCCI Post For jaspirt Bumrah:’जस्सी भाई…” जसप्रीत बूमराहच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयने केली बूमराह साठी विशेष पोस्ट, सोशल मिडीयावर होतेऊ तुफान व्हायरल..

Leave a Comment