Rishabh Pant Car Accident: आजच्याच दिवशी ऋषभ पंतचा झाला होता भयंकर अपघात, कार जळून झाली होती खाक; या दोन युवकांनी वाचवले होते प्राण..!

 Rishabh Pant Car Accident:  टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे.

आजची तारीख 30 डिसेंबर ऋषभ पंत त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरणार नाही. ३० डिसेंबर हा त्याच्या आयुष्यातील काळा दिवस.  30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात (Rishabh Pant Car Accident) झाला होता. ज्यात पंतचा जीव थोडक्यात वाचला, जणू पंतला दुसरे जीवन मिळाले.

 Rishabh Pant Car Accident

आजच्याच दिवशी असा झाला होता रिषभ पंतचा अपघात. (Rishabh Pant Car Accident)

30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात होते, तिथे रुरकीला पोहोचण्यापूर्वी त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा धोकादायक होता की, त्याला आपला जीव गमवावा लागला असता, पण करोडो चाहत्यांच्या प्रार्थनेने त्याला नवं आयुष्य मिळालं.

त्यावेळी पंत स्वतः कार चालवत होता. पंतला नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचे होते, त्यासाठी त्यांनी रुरकीला येत असल्याचे कोणालाही सांगितले नाही.

कार चालवत असताना पंतला अचानक झोप लागली, त्यामुळे त्याची कार दुभाजकावर आदळली. यावेळी कारलाही आग लागली. गाडीचा विंडस्क्रीन तोडून पंत वेळेत बाहेर आला, त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पंतच्या अपघाताची बातमी ऐकून सगळेच अस्वस्थ झाले.

 IND vs AUS : ‘भाई क्या कर रहा है तू…?” दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाल्याने रोहित शर्मावर भडकले चाहते, रोहित शर्मा होतोय तुफान ट्रोल..

 Rishabh Pant Car Accident:  आजच्याच दिवशी रिषभ पंतचा झाला होता भयंकर अपघात, कार जळून झाली होती खाक; या दोन युवकांनी वाचवले होते प्राण..!

जवळपास 14 महिने क्रिकेटपासून दूर  होता रिषभ पंत

या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पंतला तब्बल 14 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. दरम्यान, त्याच्यावर बरीच शस्त्रक्रिया करावी लागली, त्यानंतर पंतने आयपीएल 2024(IPL 2024) मध्ये शानदार पुनरागमन केले, पंतच्या पुनरागमनाने सर्वजण आनंदी होते. पंत पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसला.

यानंतर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये त्याची निवड झाली. तेव्हापासून पंत टीम इंडियाकडून सतत खेळत आहे.


WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

BCCI Post For jaspirt Bumrah:’जस्सी भाई…” जसप्रीत बूमराहच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयने केली बूमराह साठी विशेष पोस्ट, सोशल मिडीयावर होतेऊ तुफान व्हायरल..

Leave a Comment