WTC Final Scenario: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (BGT 2024-25) मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे.
सोमवारी या कसोटी सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळी या सामन्यात तिन्ही निकाल संभावित आहेत ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले आहे, जे गाठणे टीम इंडियासाठी सोपे नसेल.
जर भारताने हा सामना जिंकला तर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याची शक्यता वाढेल. मात्र भारत हा सामना हरला तर मात्र संघाच्या अडचणी वाढतील.
पाहूया भारताला जर WTC चा अंतिम सामना खेळायचा असेल तर कश्या पद्धतीने कामगिरी (WTC Final Scenario) करावी लागेल .
WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल?
जर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी हरला, तर तो WTC गुणतालिकेत पूर्वीप्रमाणे तिसऱ्या स्थानावर राहील, परंतु त्याची विजयाची टक्केवारी 55.88 वरून 52.78 पर्यंत कमी होईल.
Winning BGT was not as easy as Virat Kohli made it look like under his captaincy. We all are missing captain Kohli in these tough times🇮🇳💔. pic.twitter.com/95qrjTPXc7
— Kohlified. (@123perthclassic) December 30, 2024
मात्र, असे झाले तरी संघ WTC फायनलच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडणार नाही. त्यानंतर संघाला श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यांच्या मालिकेत पराभूत केले तरच भारताचे अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
मेलबर्नमध्ये भारताचा पराभव झाला, तर टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये होणारा पाचवा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. असे झाल्यास, बॉर्डर-गावस्कर मालिका 2-2 अशी बरोबरीत राहील आणि संघाचीविजयाची टक्केवारी 55.26% असेल.
WTC Final Scenario: IND vs AUS मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिल्यास काय होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिल्यास समीकरण पूर्णपणे बदलेल. जर हा सामना अनिर्णित राहिला आणि टीम इंडियाने सिडनी कसोटी जिंकली तर भारताची विजयाची टक्केवारी 57.017 होईल.
या स्थितीत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आशा करावी लागेल की, ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत किमान एक सामना अनिर्णित करेल, त्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी 55.26 राहील आणि त्यामुळे भारताच्या पात्रतेचा मार्ग मोकळा होईल. .
दक्षिण आफ्रिकेचा WTC फायनलमध्ये प्रवेश.
दक्षिण आफ्रिका सध्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये (WTC points Table) अव्वल आहे आणि त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 11 सामने खेळले असून या कालावधीत त्यांनी 7 सामने जिंकले आहेत, तर केवळ तीन सामने गमावले आहेत.
हेही वाचा:
IND vs AUS Live: यशस्वी जैस्वालची मोठी चूक, ठरू शकतो भारतीय संघाच्या पराभवाचा विलन…