WTC FINAL 2025: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (SA vs PAK) यांच्यातील पहिली कसोटी संपली आहे. हा रोमहर्षक सामना यजमान आफ्रिकेच्या बाजूने गेला. कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन यांनी शानदार भागीदारी करत आपल्या संघाला २ विकेट्सने विजय मिळवून दिला.
एकेकाळी असे वाटत होते की, हा (SA vs PAK 1st test) सामना पाकिस्तानी संघ जिंकेल. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फलंदाजांनी चिकाटी दाखवत हा सामना आपल्या बाजूने झुकवून घेतला.
WTC FINAL 2025: दक्षिण आफ्रिकेचा WTC फायनलमध्ये प्रवेश..
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिली कसोटी तर जिंकलीच पण 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे टीम इंडियाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिपच्या समीकरणाबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.
SA vs PAK 1ST test: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला चिरडले!
26 डिसेंबरपासून सेंच्युरियन मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (SA vs PAK 1ST test) पहिली कसोटी सुरू झाली. आफ्रिकन संघाचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान पहिल्या डावात 211 धावा करून सर्वबाद झाला होता. कामरान गुलामने 54 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून डॅन पॅटरसनने ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 301 धावांवर संपला.
Most Runs in WTC in Losing Cause:
🏴 Joe Root – 1612 (48 Innings)
🇧🇩 Litton Das – 1391 (43 Innings)
🇵🇰 Babar Azam – 1215 (32 Innings)
🇵🇰 Mohammad Rizwan – 1198 (34 Innings)
🇳🇿 Daryl Mitchell – 1120 (24 Innings) pic.twitter.com/1CvlPy9YB6— CricTracker (@Cricketracker) December 29, 2024
पहिल्या डावातील धावसंख्येच्या जोरावर पाकिस्तान यजमान संघापेक्षा 91 धावांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या डावातही या संघाला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. सौद शकीलच्या 84 धावा आणि बाबर आझमच्या 50 धावांच्या जोरावर पाकिस्तानी संघाने दुसऱ्या डावात 237 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला पहिली कसोटी जिंकण्यासाठी 148 धावा करायच्या होत्या.
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज मोहम्मद अब्बासने 6 विकेट घेत आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन केले. एकवेळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९९ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या.
यानंतर, कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन यांनी 9 व्या विकेटसाठी 51 धावा जोडल्या आणि त्यांच्या संघाला पहिली कसोटी जिंकून 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी (WTC 2024-25 FINAL) गाठण्यात मदत केली.
एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या विजयासह, त्यांनी 11 जून 2025 रोजी लॉर्ड्स येथे होणाऱ्या WTC फायनलसाठी त्यांचे स्थान निश्चित केले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धचे शेवटचे दोन कसोटी सामने कोणत्याही किंमतीत जिंकावेच लागतील. तरच त्यांचा फायनल खेळण्याचा मार्ग सुखर होईल.
हेही वाचा:
IND vs AUS Live: यशस्वी जैस्वालची मोठी चूक, ठरू शकतो भारतीय संघाच्या पराभवाचा विलन…