Jasprit Bumrah Records in AUS: ऑस्ट्रोलियाच्या भूमीवर बूमराहचा डंका, रचला अनोखा इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय..!

 Jasprit Bumrah Records:  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये रेकॉर्ड बनवण्याचा आणि मोडण्याचा खेळ सुरूच आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

 Jasprit Bumrah Records in AUS

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) एक मोठी कामगिरी केली आहे. या विक्रमासह बूमराहने  क्रिकेटच्या इतिहासातील महान वेगवान गोलंदाजांच्या यादीत आपले नाव पहिल्या क्रमांकावर नोंदवले आहे. या लेखात आपण संपूर्ण गोष्ट सविस्तरपणे जाणून घेऊया.

IND vs AUS, Jasprit Bumrah Records: जसप्रीत बुमराहच्या नावावर अनोखा विक्रम.

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आणि टीम इंडियाचा सर्वांत महत्वाचा गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे.

सोशल मीडियापासून ते संपूर्ण क्रिकेट विश्वावर या क्रिकेटपटूचा दबदबा आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या सामन्यात पहिल्या डावात कांगारू संघाचे वर्चस्व असताना बुमराहने दुसऱ्या डावात आपल्या घातक गोलंदाजीने सामन्याचे चित्रच पलटून टाकले.

Jasprit Bumrah Records: जसप्रीत बूमराहने ऑस्ट्रोलियामध्ये घेतला 200वा कसोटी बळी..

बूमराहने दुसऱ्या डावात सुद्धा आतापर्यंत एकूण 4 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि ॲलेक्स कॅरी यांच्या विकेट्सचा समावेश आहे.

या काळात भारतीय संघाच्या स्टार क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळीही पूर्ण केले. जसप्रीत बुमराहने 19.5 च्या सरासरीने हा आकडा गाठला आहे. IND vs AUS मेलबर्न कसोटीदरम्यान क्रीडा विश्वास शोककळा, या दिग्गजाचे झाले अचानक निधन..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम सरासरीने 200 विकेट घेणा-या वेगवान गोलंदाजांच्या यादीत हा खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली ॲम्ब्रोस या तीन महान गोलंदाजांना मागे टाकून त्याने नंबर-1 स्थान मिळवले आहे.

 Jasprit Bumrah Records in AUS: ऑस्ट्रोलियाच्या भूमीवर बूमराहचा डंका, रचला अनोखा इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय..!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी (IND vs AUS 4th Test) आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. चार दिवसांचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 9 गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. त्याची एकूण आघाडी आता 333 धावांवर पोहोचली आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराहने 4 तर मोहम्मद सिराजने 3 विकेट घेतल्या. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया पाहुण्या संघासाठी किती धावा उभारतो हे पाहणे बाकी आहे.


हेही वाचा:

IND vs AUS Live: यशस्वी जैस्वालची मोठी चूक, ठरू शकतो भारतीय संघाच्या पराभवाचा विलन…

ipl 2025 Mega Auction: आयपीएलच्या मागच्या हंगामात विराट कोहलीशी मैदानात भिडणाऱ्या खेळाडूवर कुणीही नाही लावली बोली, बेस प्राईज एवढी असूनही संपले करिअर..

Leave a Comment